Mumbai Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

Goregaon Accident: मुंबईच्या गोरेगावमध्ये बेस्ट बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. वनराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या अपघातामध्ये ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगावजवळ भीषण अपघात झाला. बेस्ट बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज पहाटे सहा वाजता भीषण अपघात झाला. ट्रक आणि बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. गोरेगाव परिसरात वनराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रकला बेस्ट बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही बस बोरिवलीवरून अंधेरीच्या दिशेने जात होती. बसने ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे बसमधील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले.

या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या ५ ते ६ प्रवाशांना तात्काळ जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोरेगावमधील वनराई पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनराई पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

SCROLL FOR NEXT