
संभल : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीचा अपघाता झाला आणि क्षणात सर्व संपलं. या भीषण अपघातात नवरदेवासह आठ जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
नेमका अपघात कसा झाला?
भरधाव बोलेरोचं नियंत्रण सुटल्याने कार कॉलेजच्या भितींवर आदळी. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचं प्रचंड नुकसान झालं होतं. जेसीबी आणून वाहन कापून मृतदेह बाहेर काढावी लागली. पोलिसांनी कारमधून पाच मृतदेह बाहेर काढले. तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईपर्यंत मृत्यू झाला आहे. कारमध्ये लहान मुलांसह १४ वऱ्हाडी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आईने आपल्या मुलाची पूजा करुन नजर उतरवून घरातून पाठवलं होतं. नवीन सून घरात येण्याचा आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला होता. मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं.
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात जुनावई पोलीस स्टेशन हद्दीतील जुनावई गावाजवळ, जनता इंटर कॉलेजजवळ, भरधाव वेगाने येणारी एक बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. या भीषण अपघातात नवरदेव, एक महिला आणि दोन लहान मुलांसह ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बोलेरोमध्ये १२ पेक्षा जास्त लोकं होते.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक पोहोचले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त एसपी अनुकृती शर्मा, सीओ आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरोचा वेग खूप जास्त होता आणि चालकाचे नियंत्रण सुटलं होतं. त्यामुळे गाडी थेट कॉलेजच्या भिंतीवर आदळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.