Mumbai Fire news
Mumbai Fire news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire news: मुंबईच्या चुनाभट्टीत इमारतीला भीषण आग; 2 कर्मचारी अडकल्याची शक्यता, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

जयश्री मोरे

Mumbai News : मुंबईतून आगीचं मोठं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या चुन्नाभट्टीत एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) चुनाभट्टीत गोदरेज इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ११,१२,१३ माळ्यावर मोठी आग लागली आहे. या इमारतीला लागलेल्या आगीत २ कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या इमारतील आग (Fire) लागल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ३ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर आगीच्या घटनेनंतर इमारत रिकामी करण्यात आली आहे. या आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी एकच बघ्यांची गर्दी जमा झाली होती. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा फर्निचर मार्केटला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत त एस व्हीं रोडवरील अजित ग्लासजवळच्या फर्निचर मार्केटचे अनेक गाळे जळून खाक झाले होते.

या आगीच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्नशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले होते. या आगीच्या घटनेनंतर त्या ठिकाणी असणारे दुकानदार आपले दुकानातील उरलेसुरले सामान बाहेर काढण्यासाठी धडपड करत असताना देखील पाहायला मिळाले. या आगीत मोठं नुकसाच झाल्याची शक्यता आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddh Akapoor : श्रद्धाचा अस्सल रावडी स्वॅग

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

SCROLL FOR NEXT