Sadashiv Patil during the Ambernath municipal meeting where his controversial corruption remark sparked outrage. Saam tv
मुंबई/पुणे

भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे; भरसभागृहात महायुतीच्या नेत्याचे खळबळजनक विधान

Mahayuti Leader Corruption Statement Video Viral: अंबरनाथ नगरपालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी “भ्रष्टाचार काही प्रमाणात झाला पाहिजे असे वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Mayuresh Kadav

अजय दुधाने, साम टीव्ही

सध्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महातयुतीची सत्ता आहे. याचाच गैरफायदा महायुतीचे नेते घेतांना दिसत आहे. आम्हाला कोणी काय करू शकत नाही, आमच्याकडे बहुमत आहे अशी मग्रूरीची भाषा या नेत्यांकडून पाहायला मिळत आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे उपाध्यक्ष यांनी भरसभागृहात भ्रष्टाचार झाला पाहिजे असा कानमंत्रच उपस्थित नगरसेवकांना दिला आहे.

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण टक्केवारी कमी असायला पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलं. अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत खुर्चीवर बसून पाटील यांनी हे वक्तव्य केलं. यामुळे आता सदाशिव पाटील अडचणीत येण्याची चिन्हं आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे. पण टक्केवारी कमी असायला पाहिजे असं वक्तव्य केलं. यावेळी बाजूला बसलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र खरं बोलायला कसली भीती? कोणी फाशी थोडीच देणार आहे, असं म्हणत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं. यानंतर सभागृहाच्या बाहेर येताच त्यांनी घुमजाव करत मी भ्रष्टाचार होऊ नये, असं म्हणाल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

मात्र कॅमेरे बंद होताच त्यांचा सूर बदलला आणि पत्रकारांना दमदाटी करण्यास त्यांनी सुरुवात केली. दरम्यान, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचं समर्थन करून महायुतीची प्रतिमा मलिन करणारे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर वरिष्ठ नेते काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT