Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : गृहमंत्रिपदामुळे शपथविधी रखडला? महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Political News : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी आता नवा मोठा तिढा निर्माण झालाय....एकनाथ शिंदे गृहखात्यावर अडून बसल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्रिपद भाजपकडे असेल तर गृहमंत्रिपद मिळावं अशी आग्रही भूमिका शिंदे गटानं मांडलीय. आणि यामुळेच शपथविधी लांबल्याचं बोललं जातंय...नेमका काय आहे तिढा आणि काय आहेत शिंदेंच्या अटी...त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Vishal Gangurde

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार, याकडे लागले आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय़. तसंच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युलाही ठरलाय. मात्र आता एक नवा तिढा महायुतीत उभा राहिलाय. आणि तो म्हणजे गृहमंत्रिपद.....एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़. गृहमंत्रिपदाबाबत शिंदे गटानंही तशी उघड इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे महायुतीतल्या तिढ्याचं कारण समोर आल्याचं दिसतंय.

गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचं बोललं जातंय. नेमक्या त्यांच्या काय अटी आहेत ते पाहूया.

शिंदे गृहमंत्रिपदावर अडले? -

1. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रिपद हवं

2. गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?

3. गृहमंत्रिपद न दिल्यास सरकारमध्ये सहभाग नाही?

4. फडणवीसही गृहमंत्रिपदासाठी आग्रही

5. गृहमंत्रिपदामुळेच शपथविधी लांबला?

महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतरही सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते.

आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जातंय. त्यामुळे महायुतीतील एकोपा कायम राहावा म्हणून एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं, यासाठी भाजप आग्रही आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहणार का आणि त्याहीपेक्षा भाजप गृहमंत्रालय शिंदेंना देणार का ? हा खरा प्रश्न आहे.....मात्र हा तिढा सुटल्याशिवाय शपथविधीचं अडलेलं घोडं पुढं जाणार नाही..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

MS Dhoni : IPL 2026 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या सीईओंनी दिली मोठी अपडेट

१८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाला 'तो' व्यवहारच रद्द; अजित पवारांनी दिली माहिती

Manoj Jarange: जरांगे हत्या कट प्रकरणात नवा ट्विस्ट; अटक आरोपीची पत्नी आणि आईचा गंभीर आरोप|VIDEO

PM Kisan Yojana: खुशखबर! पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार ₹२०००

SCROLL FOR NEXT