Mahayuti Government Saam
मुंबई/पुणे

Maharashtra Politcs : महायुतीच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार; कोणाचा पत्ता कट होणार?

Maharashtra Politcal News : महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा लवकरच शपथविधी होणार आहे. या शपथविधी आधीच महायुतीच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालं आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठोपाठ महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालं आहे. महायुतीचे मंत्रिमंडळ स्वच्छ आणि निष्कलंक असावे, अशी दिल्लीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाची आग्रही भूमिका आहे. यामुळे काही माजी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसणाऱ्या त्रयस्थ संस्थेकडून महायुतीच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील नव्या राज्य मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेचे आणि स्वच्छ चारित्र्याच्या आमदारांना स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाची ठाम भूमिका आहे. भ्रष्टाचारी माजी मंत्र्यांपेक्षा नव्या दमाच्या तरुण आमदारांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या स्पष्ट सूचना आहेत. येत्या काही दिवसांत नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, हे पाहावे लागेल.

महायुतीच्या आधीच्या मंत्रिमंडळातील कोण आहेत डागाळलेले माजी मंत्री

प्रगती पुस्तकात नापास ठरलेले माजी मंत्री कोण आहेत?

१) राष्ट्रवादी काँग्रेस

छगन भूजबळ, हसन मुश्रीफ

२) भाजप

सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे

३) शिवसेना

संजय राठोड, अब्दुल सत्तार

नव्या मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १३ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना शपध देणार आहे. काल झालेल्या बैठकीत १३ तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत तारखेबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळात किती आणि कोण असणार यावर देखील चर्चा आणि निर्णय होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

SCROLL FOR NEXT