Maharashtra politics : करेक्ट कार्यक्रम झालाय, लक्षात घ्या; जयंत पाटलांना टोला, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी

Ajit Pawar : अजित पवार यांनी सभागृहात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांना टोला लगावलाय. त्याशिवाय नाना पटोले यांचीही फिरकी घेतली.
Jayant Patil
जयंत पाटील Saamtv
Published On

Ajit Pawar on jayant patil : कधीतरी करेक्ट कार्यक्रम झाल्याचं लक्षात घ्यावं लागेल, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणाची चर्चा होतेय. अजितदादांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावर टीकास्त्र सोडले. लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलंय. गुलाबी जॅकेट आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलंय, काही अडचण आहे का 208 ? असे म्हणत 208 मतांनी निवडून आलेल्या नाना पटोले यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला.

काय म्हणाले अजित पवार?

निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे, मग ज्यांच्या हाती संविधान नाही त्यांना आदर नाही का ? अनेकांनी संविधानातील तरतुदी वाचल्याच नाहीत. सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं क्रम प्राप्त आहे, मग विरोधकांची भूमिका नियम बाह्य नाही का ? असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Jayant Patil
Devendra Fadnavis : तुम्ही पुन्हा येईल म्हणाले नाहीत, तरी आलात, फडणवीसांनी नार्वेकरांचं असं केलं कौतुक

कधी तरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला यावेळी अजितदादांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. आमची बाजू खरी आहे हे नागपूर अधिवेशनात दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा आम्ही रडलो नाही. 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा, असा टोला अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांना लगावला.

अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी

जयंत पाटील - अजितदादांचे माझ्यावर लक्ष आहे

अजित पवार - माझं लक्ष आहे पण तुम्ही प्रतिसाद देत नाहीत

जयंत पाटील - अजितदादा, आपल्या पक्षाचे ब्रीद आहे, योग्य वेळी योग्य निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

- देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईल, ते पुन्हा आले त्यासाठी त्यांचे अभिनंदन

- अध्यक्ष पुन्हा येईल म्हणाले नव्हते तरी ते पुन्हा आले

- आम्ही 200 हुन अधिक आमदार निवडून आणू म्हणालो होतो, अन्यथा मी शेतकरी निवडून आणू म्हणालो होतो, तो शब्द आम्ही खरा केला

- अजितदादा सोबत आले म्हणून त्यात बोनस add झाला

नाना पटोले यांचे आभार, त्यांनी अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केले, तेव्हा गाडी सुटली

नाना आमचे मित्र आहेत, नाही म्हणाले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे

- ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे

- अनेकांनी आमच्यावर आरोप केले

- काही प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते तर काही भोंगे होते

- कर नाही त्याला कशाला डर, त्याचं नाव राहुल नार्वेकर

- चव्हाण, थोरात गेले पण नाना 208 ने थोडक्यात वाचले

- ईव्हीएम घोटाळा असता तर नाना आलेच नसते

- ⁠एकनाथ शिंदेंचा नाना पटोले यांच्यावर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com