Maharashtra Assembly Session  Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Session : कुणाला 'ओम फट् स्वा:हा' तर कुणाला 'चायनीज बिल्ली'; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

Maharashtra Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सातव्या दिवशी विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होताना पाहायला मिळालं. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पायऱ्यांवर बसून सभागृहात जाणाऱ्या सत्ताधारी पक्षातील तीन नेत्यांना टार्गेट केलं.

Prashant Patil

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सातव्या दिवशी विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होताना पाहायला मिळालं. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पायऱ्यांवर बसून सभागृहात जाणाऱ्या सत्ताधारी पक्षातील तीन नेत्यांना टार्गेट केलं. प्रत्येक नेता येईल त्यांच्यावर विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यावरून घोषणाबाजी केली.

भरत गोगावले आल्यावर विरोधकांकडून 'ओम फट् स्वाहा'च्या घोषणा देण्यात आल्या. तर आमदार आदित्य ठाकरेंनी भरात गोगावलेंची टॉवेल लटकवण्याची नक्कल केली. त्यानंतर मंत्री संजय शिरसाठ विधानभवन पायऱ्यांजवळ आल्यावर शिवसेना आदित्य ठाकरेंकडून '५० खोके एकदम ओके, भ्रष्टाचारी सरकार', अशा घोषणा देण्यात आल्या. तर माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर विधानभवनात जात असताना 'शाळेचे युनिफॉर्म कुठे गेले? गुजरातला' अशा घोषणा दिल्या गेल्या.

महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे सभागृहात जात असताना विरोधकांकडून 'कोंबडी चोरांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय' अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर आदित्य ठाकरे यांच्याकडून 'चायनीज बिल्ली' असा उल्लेख करण्यात आला. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवन पायऱ्यांवरुन जात असताना आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून 'मर्सिडीस'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या चेहऱ्यावरून राग व्यक्त होताना दिसला. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि रागाने आत गेल्या.

दरम्यान, सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या विधानभवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणाऱ्या सरकारच्या विरोधात मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिकामं ठेवणं हे विधिमंडळाच्या प्रथा-परंपरांना शोभत नाही, असं म्हणत मविआच्या आमदारांनी जोरदार निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

क्षणात होत्याचं नव्हतं! ५७ प्रवाशांनी भरलेली धावती बस आगीच्या भक्ष्यस्थानी; १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Arthritis joint care tips: संधिवाताबद्दल जाणून घ्या 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी; सांध्यांची काळजी घेणं गरजेचं

ZP Teachers Salary: जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची "दिवाळी होणार गोड"; सरकारचा मोठा निर्णय

APJ Abdul Kalam: अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

SCROLL FOR NEXT