MAhavikas Aghadi  Saam TV
मुंबई/पुणे

Political News: कर्नाटकात 40 टक्के तर महाराष्ट्रात 100 टक्के भ्रष्टाचार, शिंदे-फडणवीस सरकार ऑक्सिजनवर; मविआच्या नेत्यांचं टीकास्त्र

राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तिन्ही नेत्यांना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

जयंत पाटील यांनी म्हटलं की, भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणांचा गैरवापर यामुळे भाजपचा कर्नाटकात पराभव झाला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टातील निकालावर देखील चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.

महाविकास आघाडीच्या पुढच्या वज्रमुठ सभा उन्हाळ्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात आढावा घेऊन सभा जाहीर करू, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष आणि इतर पक्ष यांना विश्वासात घेऊन सीट शेअरिंगवर लवकरच चर्चा होईल. कर्नाटकात भाजपचा जसा पराभव झाले त्याने तिन्ही पक्षाचा उत्साह वाढला आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातला सरकार कर्नाटक पेक्षा भ्रष्टाचारी- नाना पटोले

दिल्लीचं झूट आणि कर्नाटकची लूट याची ओळख लोकांना झाली आहे. महाराष्ट्रातलं सरकार कर्नाटकपेक्षाही भ्रष्टाचारी आहे. या पापाचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. भाजप सरकार हे भ्रष्टाचारी आहे. या सरकारला हद्दपार करायचा विचार आहे. (Latets News)

कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या वज्रमूठ सभेत बोलावण्याचा प्रयत्न असेल, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार ऑक्सिजनवर आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.  (Political News)

महाराष्ट्रात 100 टक्के भ्रष्टाचार - संजय राऊत

महाविकास आघाडीत कोणतीही अनबन किंवा गैरसमज नाही. कर्नाटकात 40 टक्के भ्रष्टाचार झाला असेल तर महाराष्ट्रात 100 टक्के भ्रष्टाचार आहे. हे सध्याचे सरकार भ्रष्ट आहे आणि ते पराभूत होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

कर्नाटकच्या विजयात महाराष्ट्राचा देखील भाग आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्ही जनतेत जाऊन त्यांना समजावणार आहोत. निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला आहे. मात्र मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री गैरसमज पसरवत आहे. मात्र जसा कर्नाटक जिंकला तसा आम्ही महाराष्ट्र जिंकू. सीट शेअरिंगवर प्राथमिक चर्चा झाली. आमच्यात कोणतेही मतभेद नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

SCROLL FOR NEXT