Pradeep Kurulkar: भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यात लावली 'फिल्डिंग'; प्रदीप कुरुलकरांना अडकवण्यासाठी क्रिकेट सामन्याचा वापर

Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर यांची एटीएसच्या चौकशीदरम्यान ही बाब समोर आली आहे.
DRDO - Pradeep Kurulkar
DRDO - Pradeep Kurulkarsaam tv

अक्षय बडवे

Pune News : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने अटक केली आहे. गुप्तचर यंत्रणेकडूनी त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर यांना अडकवण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्याचा आधार घेण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

प्रदीप कुरुलकर यांची एटीएसच्या चौकशीदरम्यान ही बाब समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झारा दासगुप्ता या बनावट नावाने कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.  (Pradeep Kurulkar) 

DRDO - Pradeep Kurulkar
Who is Pradeep Kurulkar: कोण आहेत प्रदीप कुरुलकर? पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनीट्रॅपमध्ये कसे अडकले?

या सामन्यादरम्यान कुरुलकर यांच्याशी बनावट पद्धतीने संपर्क साधणाऱ्या पाकिस्तानी तरुणीने भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करून कुरुलकरांचा विश्वास संपादन केला होता. आपण लंडनमधे राहत असलो तरी भारतीय चाहते आहोत, हे दाखवण्याचा झारा दासगुप्ताचा प्रयत्न होता. कुरुलकरांना 15 मे पर्यंत एटीएस कोठडी असून या प्रकरणात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तान हेरांच्या संपर्कात

प्रदीप कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते. (Pune News)

कोण आहेत प्रदीप कुरुलकर?

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदीप कुरुलकर यांची क्षेपणास्त्र क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून गणना होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com