Prataprao Borade Saam tv
मुंबई/पुणे

Prataprao Borade: मराठवाड्याचे शैक्षणिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड; प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे निधन

जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे.

Vishal Gangurde

Prataprao Borade: महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास बोराडे यांनी अखेरचा श्वास घेतला. बोराडे यांच्या निधनानंतर मराठवाड्यासहित राज्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत प्रतापराव बोराडे यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. (Latest Marathi News)

प्रतापराव बोराडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. शरद पवार ट्विट करत म्हणाले, 'ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली'.

'मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता, असे ते म्हणाले.

'मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, प्रतापरावांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन, असे शरद पवार पुढे म्हणाले.

दरम्यान, प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक मोलाचे योगदान दिले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलं आहे. बोराडे हे जवाहरलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. प्रतापराव बोराडे यांचा विविध व्यावसायिक संस्थांशी संबंध होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT