Ravindra Waikar News: मुंबईतील 500 कोटींचा भूखंड घोटाळा प्रकरण, ठाकरे गटाच्या नेत्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 5 तास चौकशी

Land Scam Case: मुंबईतील 500 कोटींचा भूखंड घोटाळा प्रकरण, ठाकरे गटाच्या नेत्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 5 तास चौकशी
Ravindra Waikar News
Ravindra Waikar NewsSaam Tv
Published On

Land Scam Case News: ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी करण्यात आली आहे. 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई सुरु आहे.

रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेची दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे 500 कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

Ravindra Waikar News
Chief Minister Relief Fund: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात १०० कोटी रुपये मदतीचा आकडा पार

रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी अनधिकृत कब्जा केला, असाही त्यांच्यावर आरोप सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. (Latest Marathi News)

गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले आहेत की, ''500 कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत तक्रार केली होती. मला आधीच बोलावलं होतं, पण मी वेळ वाढवून मागितला होता. एक मनुष्य खोटा आणि विकृत आहे.''

Ravindra Waikar News
Devendra Fadnavis News: सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मी कोणतीही चोरी, गैरप्रकार केलेला नाही'

वायकर पुढे म्हणाले, ''मी कोणतीही चोरी, गैरप्रकार केलेला नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. किरीट सोमय्या सारखा माणूस हा आमच्या तक्रारी करत आहे. किरीट याला खरं तर तोंड दाखवायला जागा नाही. तरी तो आमच्या तक्रारी करत आहे. पण आम्ही कोणाला घाबरत नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com