Devendra Fadnavis News: सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nashik News: सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSaam Tv
Published On

Nashik News: नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरुपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहूल आहेर, राहूल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis News
Imran Khan Arrested: भेटवस्तू घोटाळाप्रकरणी इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; 5 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणारा काळ आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पोलीस हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रति निष्ठा बाळगून आपली व देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

लोकांच्या सेवेकरिता आपण पोलीस दलात रुजू झालो आहोत, शिस्तीत काम करीत असताना संवेदना जिवंत ठेवल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देऊ शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण मेडल असेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis News
National Saving Certificate Scheme: बँकेत एफडी करण्याऐवजी या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल जबरदस्त फायदा

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडतांना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

पोलीस महासंचालक रजनीश सेठ आपल्या यावेळी म्हणाले की, प्रशिक्षणार्थी आज आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचित व शोषित घटकास समान न्याय व संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे. असे पोलीस महासंचालक त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com