Ladki Bahin yojana News  Saam tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin yojana : २१०० रुपये दूरच, १५०० रुपयेही मिळणार नाहीत; सरकार देणार लाडक्या बहिणींना मोठा झटका

Ladki Bahin yojana News : लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती आली आहे. अडीच लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना योजनेचे पैसे आता मिळणार नाहीत.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट हाती आली आहे. सरकारने लाडक्या बहिणींना मोठा झटका दिला आहे. लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणींचे उत्पन्न तपासलं जाणार आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असणार आहेत, त्या महिलांना १५०० रुपये मिळणार नाही. सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दणका बसणार आहे.

लाडक्या बहीण योजनेबाबत नवी माहिती हाती आली आहे. राज्य सरकार आता लवकरच लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा लाडक्या बहिणींचे लाभ बंद होणार आहेत. सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

किती टप्प्यात होणार पडताळणी?

लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलेच्या अर्जांची पाच टप्प्यात पडताळणी होणार आहे. योजनेतील ज्या पात्र महिला दोन योजनांचा लाभ घेत आहेत. त्या महिलांना आता एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. या टप्प्यानंतर लाडक्या बहीण योजनेतील पात्र महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहेत.

ज्या महिलांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांहून अधिक आहे. त्यांची नावे योजनेतून बाद केली जाणार आहेत. निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. सरकारने पडताळणी करण्यास सुरुवात करणार केली आहे. मात्र, सरकारच्या निर्णयाने निकषाबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांना धक्का बसणार आहे.

दरम्यान, सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेत एकूण २.५३ कोटी महिला लाभ घेत आहेत. या महिलांना एकूण ३७,९५० कोटी रुपये लाभाची रक्कम अपेक्षित आहे. या बजेटमध्ये ३४००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

India Playing 11 vs Eng : ओव्हल कसोटीत टीम इंडियात होणार ४ बदल; अशी असू शकते संभाव्य प्लेइंग ११

Eduacation News: राज्याच्या ७० आयटीआयमध्ये नवा अभ्यासक्रम; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Shravan 2025: श्रावणात जेवणाची योग्य वेळ कोणती?

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT