Maharashtra Weather: 7 Districts Under Yellow Alert For Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update : राज्यात विजांसह मुसळधार पाऊस, नाशिकसह ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Today Update News : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून जळगाव, नाशिकसह ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला

  • जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये विजांसह पावसाची शक्यता

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

  • पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश परिसरातील हवामान प्रणालीचा महाराष्ट्रातील पावसावर परिणाम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जळगाव, नाशिकसह मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवत ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत आज काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यताही असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागांसह कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. अल निनोचं संकट तीव्र होत चालल्याने त्याचा प्रभाव वातावरणावर होत आहे. परिणामी पावसाचा जोर कमी झाला असून नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या पुढील हालचालींवर महाराष्ट्रातील पावसाचे चित्र काही प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात खाद्यतेलावर धडक कारवाई

Breast Cancer : महिलांनो ब्रेस्ट दुखणं सामान्य नाही; कॅन्सरचा असू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या ६ लक्षणे?

Sunday Horoscope : देवीच्या कृपेने पैसा वाढवण्याची मोठी संधी मिळेल, ६ राशींनी राहा सावध; वाचा रविवारचे राशीभविष्य

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

SCROLL FOR NEXT