India : भारतातील अनोखं गाव! पर्यटकांना इथल्या वस्तूंना, लोकांना हात लावण्यास मनाई, चूक केल्यावर शिक्षाही मिळते

Shreya Maskar

अनोखं गाव

मलाना हे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पार्वती खोऱ्यात वसलेले एक निसर्गरम्य आणि रहस्यमय गाव आहे.

A unique village | google

मलाना गाव

मलाना गाव आपली अनोख्या संस्कृती, कडक नियम आणि जगप्रसिद्ध 'मलाना क्रीम'साठी ओळखले जाते. आयुष्यात एकदा या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Malana village | google

नो टच रूल

मलाना गाव तेथील कडक 'स्पर्श-निषेध' (नो टच रूल-no-touch) नियमासाठी प्रसिद्ध आहे. या नियमानुसार, धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी बाहेरच्या लोकांना गावकऱ्यांना, घरांना, भिंतींना किंवा मंदिरांना स्पर्श करण्यास मनाई आहे. स्थानिक लोक बाहेरील व्यक्तींना 'अशुद्ध' मानतात.

No touch rule | google

नियम मोडला तर भरावा लागतो दंड

जर एखाद्या पर्यटकाने हा नियम मोडला, तर शुद्धीकरण विधी करण्यासाठी त्याला २,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागतो.

If you break the rules, you have to pay a fine | google

प्राचीन स्व-शासन

येथे भारतीय कायदेशीर व्यवस्थेपासून वेगळी अशी स्वतंत्र लोकशाही पद्धत पाळली जाते. गावाचे मुख्य दैवत 'जामलू देवता' हे एका पारंपरिक परिषदेच्या माध्यमातून गावाचा कारभार चालवतात. येथे सहसा पोलिसांचा हस्तक्षेप टाळला जातो आणि स्थानिक वाद आपापसातच सोडवले जातात.

Ancient Self-Government | google

भाषा

'कनाशी' ही येथील स्थानिक भाषा आहे जी केवळ ग्रामस्थच बोलतात. ही एक अलिखित बोलीभाषा आहे जी, शेजारच्या कोणत्याही भाषेशी मिळतीजुळती नाही आणि ऐकायला संस्कृत व तिबेटी बोलीभाषांचे मिश्रण वाटते. बाहेरील व्यक्ती ही गुप्त भाषा वापरू शकत नाहीत किंवा शिकू शकत नाहीत.

language | google

दंतकथा

येथील रहिवासी हे अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्यातील अशा सैनिकांचे वंशज आहेत जे तिथेच राहून गेले होते, अशी एक लोकप्रिय स्थानिक दंतकथा प्रचलित आहे.

legend | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : हजारो रुपये खर्च करून दूर कशाला जायचं? 'हा' धबधबा देईल स्वित्झर्लंडचा फील

India Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...