India Waterfall : हजारो रुपये खर्च करून दूर कशाला जायचं? 'हा' धबधबा देईल स्वित्झर्लंडचा फील

Shreya Maskar

परदेशातील वॉटरफॉल

तुम्हाला परदेशातील वॉटरफॉलसारखा किंवा त्याहून सुंदर धबधब्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी दूधसागर धबधब्याला भेट द्या.

Overseas Waterfalls | google

दूधसागर धबधबा

दूधसागर धबधबा गोवा आणि कर्नाटक या भारतीय राज्यांच्या सीमेवर मांडवी नदीवर वसलेला आहे. येथे निसर्गाचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.

Dudhsagar Waterfall | google

धबधब्याची उंची

दूधसागर धबधबा हा ३१० मीटर (१,०१७ फूट) उंचीवरून खाली कोसळणाऱ्या चार टप्प्यांच्या विलोभनीय प्रवाहासाठी प्रसिद्ध आहे.

Height of waterfall | google

दुधाचा समुद्र

वेगाने खाली येणारे पाणी दुधाच्या प्रचंड प्रवाहासारखे दिसते, म्हणूनच याला कोकणी भाषेत 'दूधसागर' (दुधाचा समुद्र) असे नाव पडले आहे.

sea of milk | google

दुधासारखे रूप

खडकांवर आदळणाऱ्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे पांढऱ्या शुभ्र फेसाची निर्मिती होते, जी अगदी दुधासारखी दिसते.

milky form | google

रेल्वे प्रवास

गोवा-कर्नाटक रेल्वे मार्गावरील एक पूल थेट धबधब्याच्या समोरून जातो, ज्यामुळे येथून रेल्वेचा प्रवास करताना अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळते. हिंदी चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये दूधसागर धबधबा दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी हॉटस्पॉट बनला आहे.

train travel | google

हिरवेगार जंगल

दूधसागर धबधबा पश्चिम घाटातील हिरव्यागार परिसरातील 'भगवान महावीर अभयारण्य' आणि 'मोल्लेम राष्ट्रीय उद्याना'च्या आत खोलवर वसलेला आहे.

Green forest | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मुंबईजवळचं सिक्रेट हिल स्टेशन! पावसाळ्यात निसर्गाचा घ्या मनमुराद आनंद

Mumbai Hill Station | AI PHOTO
येथे क्लिक करा...