Shreya Maskar
मुंबईजवळ ठाणे येथे येऊर हिल्स हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात वीकेंडला तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता. तसेच फोटोशूटचा आनंद घ्या.
येऊर हिल स्टेशन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्व सीमेवर एक निसर्गरम्य 'बफर झोन' म्हणून वसलेले आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग खुलतो.
थंडगार वारा, हिरवीगार झाडे आणि स्वच्छ हवा यामुळे लोक याला 'ठाण्याचे महाबळेश्वर' म्हणतात.
तुम्ही रिमझिम पावसात येथे ट्रेकिंगचा आनंद घ्या. मित्रांसोबत ट्रिप प्लान करा. येथे स्थानिक लोक सकाळी आणि संध्याकाळी जॉगिंगसाठी, सायकलिंगसाठी येतात.
हायकिंगची आवड असलेले लोक हिरव्यागर जंगलाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे येतात. मुसळधार पावसामुळे हे डोंगर हिरवेगार होतात.
पावसाळ्यात येथे लहान धबधबे आणि ओढे पाहायला मिळतात. जंगलात अनेक दुर्मिळ पक्षी आणि प्राण्यांचे निवासस्थान आहे.
तुम्ही ट्रेनने ठाण्यापर्यंत प्रवास करा. ठाणे स्टेशनला उतरल्यावर बस किंवा रिक्षाने तुम्ही येऊर हिल स्टेशनला पोहचाल. google
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.