Shreya Maskar
येणारा वीकेंड तुम्ही कल्याणला प्लान करा. येथील सुंदर ठिकाणांची नावे आताच नोट करा. कल्याण स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने या सर्व ठिकाणी सहज पोहचाल.
उल्हास नदीच्या काठावर वसलेला गणेश घाट हा संध्याकाळच्या नयनरम्य दृश्यांसाठी लोकप्रिय आहे. येथे संध्याकाळी स्ट्रीट फूड, राईड्सचा आनंद घेता येतो.
उंबरडे तलाव हा सूर्यास्ताच्या सुंदर नजाऱ्यासाठी ओळखला जातो. येथील स्थानिक लोकांसाठी हे विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण आहे.
काला तलाव हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तलावाच्या काठावर फिरण्यासाठी एक आल्हाददायक वातावरण अनुभवता येते. येथे निवांत फेरफटका मारू शकता.
उल्हास नदीच्या काठावर एका नैसर्गिक उंचवट्यावर वसलेला दुर्गाडी किल्ला ऐतिहासिक महत्त्व आणि पाण्यांची विहंगम दृश्ये यांचा सुरेख संगम साधतो.
बदलापूरजवळ असलेले बारवी धरण हे टेकड्या आणि जलाशयांनी वेढलेले आहे. पावसाळ्यात येथे हिरवेगार वातावरण अनुभवता येते.
मलंगगड किल्ला हा 'हाजी मलंग' म्हणूनही ओळखला जातो. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे. लहान मुलांसोबत येथे नक्की जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.