Maharashta Heavy Rain News Update  Saam tv
मुंबई/पुणे

Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; तुमच्या शहरातील पावसाचा अंदाज काय? वाचा

Maharashtra Weather Update Today News : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अमरावती आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट, तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

  • अमरावती आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट

  • अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

  • हवामानावर एल निनोचा परिणाम

राज्यात श्रावण सरींची उघडीप पाहायला मिळत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता हळूहळू जोर धरायला सुरुवात केली आहे. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरु आहे, तर मध्य भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसाची स्थिती अधिक अनुकूल झाली आहे. आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, आज अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. जळगाव, मराठवाड्यातील संभाजीनगर, तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याबरोबरच अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळू शकतो. काही भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याच्या प्रभावामुळे पुढील काळात विदर्भातील पावसाच्या स्थितीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनात गटबाजी

Elon Musk Warn: पुढच्या 50 वर्षात जगाचा अंत; बुडत्या जगाला कोण वाचवणार?

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्षफुटीला 1999च्या पक्ष घटनेचा आधार; सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेचा जोरदार युक्तीवाद

Thursday Horoscope : आज या राशींना मिळणार मोठी संधी! तुमची रास यात आहे का? वाचा एका क्लिकवर

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT