महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून उत्तर महाराष्ट्रात गारठा
धुळे येथे ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
निफाडमध्ये ६.५ अंश, तर जळगावमध्ये ८ अंश सेल्सिअस तापमान
नाशिक आणि यवतमाळमध्ये १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. धुळे, निफाड आणि जळगाव या भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली असून, पहाटेच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे.
हवामानातील या बदलामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाने ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर त्याची ताकद कमी होऊ लागली आहे. मात्र, या हवामान प्रणालीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान खाली आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. धुळे येथे ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाडमध्ये ६.५ अंश आणि जळगावमध्ये ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय नाशिक आणि यवतमाळ येथे १० अंश, तर परभणीच्या कृषी केंद्रात १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री घराबाहेर पडताना नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
दरम्यान, आज राज्यातील काही भागांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या उरलेल्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे, राज्यातील किमान तापमानात झालेली घट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी लवकर आणि रात्री बाहेर पडताना काळजी घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.