'दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकशी चर्चा नाही'; राहुल गांधींचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा

Rahul Gandhi Warn To Pakistan : आता बातमी राहुल गांधींची, राहुल गांधींनी थेट अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा दिलाय. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या विद्यार्थ्याशी संवाद साधताना राहुल गांधींना हा इशारा दिलाय. नेमका काय आहे इशारा ? पाहूयात हा रिपोर्ट.
Rahul Gandhi warns Pakistan during US visit
Rahul Gandhi warns Pakistan during US visitsaam tv
Published On: 

अमेरिका दौऱ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी शिकागो विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधींनी रोखठोक उत्तर दिलीयेत. मात्र, या संवादात राहुल गांधींना भारत आणि पाकिस्तान संबंधाबाबत प्रश्न विचारण्यात आला. आणि प्रश्न दुसरा तिसरा कुणी नव्हे तर पाकिस्तानी विद्यार्थ्यानं विचारला. या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला ते पाहूयात.

भारत-पाकिस्तान संबंधांवर पहिल्यांदाच राहुल गांधींनी मोठं भाष्य केलंय. इतकंच नव्हे तर पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याची ठाम भूमिकाही त्यांनी थेट अमेरिकेतून मांडलीये. मुळात ऑपरेशन सिंदूरच्या यशावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना वारंवार लक्ष्य केलं होतं. मात्र आता राहुल गांधींनी पाकिस्तानातल्या दहशतवादाच्या मुद्याला हात घातल्यामुळे यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.