Dry weather conditions prevail in Maharashtra as monsoon activity weakens, with rising temperatures and humidity across Mumbai, Pune, and other regions. saam tv
मुंबई/पुणे

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Maharashtra Weather Forecast Next 7 Days No Rain Alert: पुढील ७ दिवस महाराष्ट्रात पावसाची विश्रांती राहणार असून मुंबई, पुण्यासह राज्यात कुठलाही अलर्ट नाही. तापमान वाढ आणि आर्द्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पावसासाठीचे पोषक वातावरण तयार झालं नसल्याने पुढील ६ ते ७ दिवस मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील आणि पावसाची कुठला ही अलर्ट नसल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दिलीय. गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानंतर गेल्या २ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील ७ दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक असा हलक्या सरींचा पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील पुढील ७ दिवसांमध्ये वातावरण आणि पावसाचा प्रवास कसा असणार आहे.

पावसाची विश्रांती, आर्द्रता वाढली

महिन्याच्या सुरुवातील मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसराला तूफान पावसाने झोडपून काढले. मात्र मागच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई आणि परिसरातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. पुढच्या आठवड्यात पारा 33 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

राज्यात तापमानाचा पारा वाढला

कोकण विभागात देखील सूर्य आग ओकत असून डहाणू आणि अलिबाग या दोन्ही केंद्रांवर 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय. अलिबाग केंद्रावर नेहमीपेक्षा 3.3 अंशांनी, तर डहाणू केंद्रावर 2.7 अंशांनी कमाल तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे 35.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. तर विदर्भामध्ये राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे पारा 36 अंशांच्या पार पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

Maharashtra News Live Update: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत

Tukaram Mundhe: मालिका, चित्रपट, सिरीजच्या शूटिंग सेटवर निकृष्ट दर्जाचे अन्न? थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार

व्हिएतनाममध्ये ३३ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

SCROLL FOR NEXT