अमित शाह Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : मुंबईत आलेल्या अमित शहांचा महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना शब्द; फडणवीसांनीही दिला 'अलर्ट'

Maharashtra Politics : आपण राजकारणात आहे. जो सरकार बनवतो तोच विजयी. निराशेला गाडून कामाला लागा. मी शब्द देतो, महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Namdeo Kumbhar

Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राची निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा व दशा बदलेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेय. ते मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याशिवाय सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्रही सोडले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेय. गाफील राहू नका, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Amit Shah in Mumbai) आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आज मुंबईत कार्यकर्त्यांशी सवांद साधताना अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलेय.

राजकारणाची दिशा व दशा बदलेल -

मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. म्हणून मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. माझ्या अनुभवावरून सांगतोय, काही निवडणूक या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. महाराष्ट्राची निवडणूक (Maharashtra Elections 2024) देशाच्या राजकारणाची दिशा व दशा बदलेल. ६० वर्षांत कुठलाही राजकीय पक्ष सलग तीन वेळा जिंकलेला नाही, असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.

राहुल गांधींनी किती निवडणूक जिंकल्या? एका परीक्षेत ९० टक्के गुण मिळालेला विद्यार्थ्याला ८५ टक्के गुण मिळाले. पण २० टक्के मिळणाऱ्या विद्यार्थ्याला ३० टक्के मिळाले. तरीही ३० टक्के मिळालेला विद्यार्थी गावात मिठाई वाटतो, हा मूर्खपणा आहे.
अमित शाह

आपण राजकारणात आहे. जो सरकार बनवतो तोच विजयी. निराशेला गाडून कामाला लागा. मी शब्द देतो, महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असेही शाह म्हणाले.

सरकार येते व जाते, पण... -

लोकसभेत फक्त २ जागा आल्या तरी एकही कार्यकर्ता आपला पक्ष सोडून गेला नव्हता, हा आपला इतिहास आहे. आपण निवडणूक हरणार आहोत, हे ८०च्या दशकातील कार्यकर्त्यांना माहिती होते. तरीही काळजी नव्हती. आपण राजकारणात महान भारताच्या रचनेसाठी आलो आहोत. पंतप्रधान किंवा कुठल्याही पदासाठी नव्हे, सरकार येते व जाते. पक्ष निती व विचार सोडतात. आपले सरकार १० वर्षे चालले पण आपण विचार किंवा निती सोडली नाही, असे अमित शाह म्हणाले.

काश्मीर आपला आहे हे विरोधात असतानाही आपण बोलत होतो. तेव्हा आपले सरकार येईल असे कुणाला वाटले होते का? पण आपले सरकार आले व कलम ३७० आपण हटवले. राम मंदिर होईल असे कुणाला वाटले होते का? पण भूमि पूजन नव्हे तर मंदिर पण तयार केले. आज जय श्री राम हक्काने बोलत आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले.

गाफील राहू नका - देवेंद्र फडणवीस

अति विश्वास ठेवू नका व गाफील राहू नका, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय.

आपले विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलेही तडजोड करायला तयार आहेत. सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. ३ कोटींहून अधिक लाभार्थी सरकारचे आहेत. त्यांची मते मिळाली तरी सरकार पुन्हा येईल.

उद्धव ठाकरेंचे नाव घेत फडणवीस यांची टीका

उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत.

आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती सध्या आहे. पण अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT