Maharashtra Vidhan Parishad Election: विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार? आमदार फुटण्याची महायुतीला भीती, पडद्यामागे काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Vidhan Parishad Election: विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार? आमदार फुटण्याची महायुतीला भीती, पडद्यामागे काय घडतंय?

Priya More

गणेश कवडे, मुंबई

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २ जुलै हा शेवटचा दिवस आहे. अशामध्ये विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला आमदार फुटण्याची भीती आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडे ९, तर मविआकडे २ उमेदवारांपुरती मते आहेत. भाजपकडे ५ आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी २ उमेदवारांची मते आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे एका उमेदवाराची मते, तर मविआकडे एकूण २ उमेदवारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिल्यास भाजप सहावा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा देखील दावा केला जात आहे. महायुतीची ६ मते फुटल्यास महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत ही आमदार फुटणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी नऊ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे २ उमेदवार सहजपणे निवडून येण्याची शक्यता आहे. फक्त ११ व्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. या ११ व्या जागेसाठी शेकापचे नेते जयंत पाटील उत्सुक आहेत. जयंत पाटील यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा विधानपरिषदेवर निवडून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain : समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली; उत्पन्नावरही परिणाम होण्याची भीती

Video : 'तुम्ही दमडी दिली नाही आणि म्हणता ५००० रुपये द्या'; लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर

Paper Leak Bill : पेपरफुटीला सरकार घालणार लगाम; विधानसभेत विधेयक सादर, किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद?

Marathi Live News Updates: 'वर्षा'वर खेळाडूंचं स्वागत, मुख्यमंत्र्यांनी केला रोहित शर्माचा सत्कार

Ladki Bahin Yojana Money : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT