How To Store Dry Coconut: सुकं खोबरं साठवून ठेवण्यासाठी सोप्या 5 ट्रिक , महिनाभर राहिल फ्रेश

Manasvi Choudhary

स्वयंपाकघरातील पदार्थ

स्वयंपाकघरातील महत्वाचे पदार्थ दिर्घकाळ साठवून ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. खराब होऊ नये म्हणून ते योग्य रित्या साठवावे.

Kitchen Hacks | GOOGLE

योग्य साठवणूक

सुके खोबरे योग्य रित्या साठवून न ठेवल्यास त्याला कुबट व खऊट वास येऊ लागतो तसेच बुरशी देखील येते यासाठी खोबरे साठवून ठेवताना बारकाईने लक्ष द्यावे.

How To Store Dry Coconut

ही चूक करू नका

अनेकदा आपण बाजारातून खोबरे आणल्यानंतर ते तसेच डब्यात ठेवतो यामुळे खोबरे खराब होते व खऊट होऊ शकते.

How To Store Dry Coconut

उन्हामध्ये सुकवून ठेवा.

बाजारातून खोबरे आणल्यानंतर ते एका ताटामध्ये ठेवून उन्हामध्ये वाळवून घ्या यामुळे खोबरे खराब होत नाही.

How To Store Dry Coconut

हवाबंद पिशवीमध्ये ठेवा.

खोबरे दिर्घकाळ म्हणजेच महिनोनमहिने टिकवण्यासाठी ते हवाबंद पिशवीमध्ये ठेवणे गरजेचे आहे.

How To Store Dry Coconut

खोबऱ्याला बुरशी लागत नाही

तुम्ही खोबरे पॅक डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा यामुळे खोबऱ्याला बुरशी लागत नाही आणि त्याची चवही बदलत नाही.

How To Store Dry Coconut

साखर आणि लवंग मिक्स करा

खोबऱ्याच्या डब्यात थोडी साखर किंवा ३-४ लवंगा टाकून ठेवाव्या. लवंगाच्या वासामुळे खोबऱ्याला कीड किंवा मुंग्या लागत नाहीत.

How To Store Dry Coconut

ओल्या जागी खोबरे ठेवू नका

खोबरे साठवण्याची जागा कोरडी आणि थंड असावी. गॅसच्या जवळ किंवा आर्द्रता असलेल्या ठिकाणी खोबरे ठेवू नका.

How To Store Dry Coconut

next: Red Backless Blouse: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त घाला बॅकलेस ब्लाऊज, पार्टीत सर्वजण तुमच्याकडेच पाहतील

येथे क्लिक करा..