MLC Election 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

MLC Election 2022: भाजपचा पुन्हा महाविकास आघाडीला धक्का; प्रसाद लाड विजयी

या निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेसाठी आज निवडणूक झाली. ही निवडणूक (Election) राज्यसभेसारखीच चुरशीची झाली. भाजपने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली होती. या निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागली होती. आता या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत.

मत मोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या (NCP) रामराजे नाईक निंबाळकर यांचे एक मत बाजूला काढले असल्याची माहिती मिळाली. तर भाजपचेही एक मत बाजूला काढल्याचे समोर आले. भाजपचे प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीला पुन्हा धक्का दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला आहे. तर प्रसाद लाड, प्रविण दरेकर यांच्यासहीत भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. सचिन अहिर, तर आमशा पाडवी यांचा विजय झाला आहे.

राज्यसभेनंतर आता पुन्हा भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केलेला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. महाविकास आघाडीसह भाजपनेही विधान भवनासमोर जल्लोष सुरु केला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मत फुटली असल्याचे बोलले जात आहे राज्यसभेच्या निवडणुकीत ११४ संख्याबळ असताना १२३ मतांचा आकडा भाजपने गाठला होता. आता विधान परिषदेत या आकड्यात वाढ झाली आहे. १३३ चा आकडा पहिल्या पसंतीचा भाजपने गाठला आहे. राज्यसभेच्या अकड्यापेक्षा अधिक १० मत महाविकास आघाडीची फोडण्यात भाजपला यश आले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kobra Viral Video: भलामोठा क्रोबा पकडल्यानंतर जेव्हा हातातून पुन्हा निसटतो, तेव्हा काय घडतं? धडकी भरवणारा Video

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, मुंबई हायकोर्टात याचिका

Awhad vs Padalkar : सर्वसामान्यांना विधानसभा अधिवेशनाचा पास कसा मिळवता येणार? नियम काय?

Maharashtra Live News Update: अकोला पोलिसांकडून आरोपींच्या 2 ठिकाणी 'रोड शो'

Heavy Rainfall: जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?

SCROLL FOR NEXT