विधानपरिषद निवडणूक निकालाआधीच महाविकास आघाडीला मोठा झटका; 'या' मंत्र्याला ईडीची नोटीस

विधानपरिषद निवडणूक मतमोजणीच्या आधीच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडली आहे.
Maha vikas aghadi
Maha vikas aghadi Saam Tv
Published On

मुंबई : विधानपरिषद निवडणूक मतमोजणीच्या आधीच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडली आहे. ईडीने सलग अनिल परब यांना दुसऱ्यांदा ईडीची (ED) नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत भर पडली आहे. ( Anil Parab News In Marathi )

Maha vikas aghadi
आमदार रवी राणा यांना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस याआधी देखील पाठवण्यात आली होती. त्यावेळी ईडीने कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र,त्यावेळी अनिल परब पूर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे ईडी कार्यालयात गेले नव्हते. अनिल परब पहिल्यांदा पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसच्या तारखेला शिर्डी दौऱ्यावर होते. त्यामुळे ईडीने नोटीस देऊनही परब हजर झाले नव्हते. त्यानंतर आता ईडीने पुन्हा अनिल परब यांना नोटीस धाडण्यात आली आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Maha vikas aghadi
MLC ELECTION 2022 : निकालाआधीच एकनाथ खडसे समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये लावले विजयाचे बॅनर

काय आहे प्रकरण ?

'अनिल परब यांनी दापोलीतील रिसोर्ट विभास साठे यांच्याकडून विकत घेतला होता. यामध्ये १ कोटी १० लाखांचा व्यवहार झाला तसेच व्यवहारात साठे यांना काळा पैसा दिला', आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 'खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं', तसेच ती जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.

"७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.", असा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com