आमदार रवी राणा यांना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रवी राणा (Ravi Rana) यांचा अटक वॉरंट रद्द केला आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Ravi rana
Ravi rana Saam Tv

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. हनुमान चालिसा प्रकरणी चर्चेत आलेले अमरावती (Amaravati) अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. त्यामुळे रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रवी राणा (Ravi Rana) यांचा अटक वॉरंट रद्द केला आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ( Ravi Rana Latest News In Marathi )

Ravi rana
'काही निर्णय चांगले वाटणार नाहीत, पण...'; 'अग्निपथ' योजनेवर मोदींची पहिली प्रतिक्रिया

अमरावतीच्या आयुक्तांवर रवी राणा यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांचे पाच ते सहाज जणांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, त्यावेळी रवी राणा घरी नव्हते. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाआधी रवी राणा यांना अटक होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रवी राणा यांचा अटक वॉरंट रद्द केला आहे. त्यांना कोर्टाने दोन आठवड्याची मुदत दिली आहे. दोन आठवड्यानंतर रवी राणा यांना पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

Ravi rana
Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

काय होतं प्रकरण ?

गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमरावती महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हटवला होता. त्यामुळे अमरावती वातावरण तापलं होतं. या वादात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेने उडी घेतली होती. अमरावती महापालिकेच्या त्या निर्णयाविरोधात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजपेठ येथे महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकरण शाई फेकून त्यांचा निषेध केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आमदार राणांविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com