Maharashtra Teachers Update : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Teachers : शिक्षकांसाठी मोठी बातमी; हजारो शिक्षकांना मिळणार नव्या वेतनश्रेणीचे प्रमाणपत्र

Maharashtra Teachers Update : शिक्षकांसाठी मोठी बातमी हाती आलीये. हजारो शिक्षकांना नव्या वेतनश्रेणीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

Vishal Gangurde

३४ हजारांहून अधिक शिक्षकांना SCERT कडून पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे दिली जाणार

५ हजारांहून अधिक शिक्षक अनुत्तीर्ण

५६३ शिक्षकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित

प्रमाणपत्रांमुळे शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी प्रस्ताव पाठवता येणार.

मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. तरीही त्यांना प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रस्तावावर शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हता. त्यामुळे या शिक्षकांचं मोठं नुकसान होत होतं. एससीईआरटीकडून तब्बल ३४ हजार शिक्षकांना पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयांमधील एकूण ४० हजार ८१ शिक्षकांकडून वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण ३९ हजार ८४१ शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र ठरले होते. त्यातील ५ हजार ५२७ शिक्षक हे प्रशिक्षणादरम्यान अनुत्तीर्ण होते.

३४ हजार ३१४ शिक्षकांनी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. त्यापैकी ३३ हजार ५७२ शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. तर ५६३ शिक्षकांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रमाणपत्रासाठी शिक्षक संघटनांचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु होता.

शिक्षकांना प्रमाणपत्र मिळण्यात उशीर का झाला?

प्रशिक्षण पूर्ण असूनही SCERT कडून प्रमाणपत्र मिळालं नव्हतं. त्यामुळे शिक्षकांना निवड आणि वरिष्ठ श्रेणीसाठी प्रस्ताव पाठवता येत नव्हता.

किती शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे?

राज्यातील ३४ हजार ३१४ शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय. त्यातील ३३ हजार ५७२ शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत.

शिक्षकांना प्रमाणपत्रामुळे काय फायदा होणार?

शिक्षकांना या प्रमाणपत्रांमुळे पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढे नेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

गोव्यात परदेशी महिलेवर सोलापूरच्या डॉक्टराकडून बलात्कार; ICU रूममध्ये घाणेरडं कृत्य

TET Exam: टीईटी पास व्हा, नाहीतर नोकरी सोडावी लागणार...शिक्षकांवर सेवानिवृत्तीची टांगती तलवार, वाचा सविस्तर

Aloo Kofta Recipe: बटाट्याची तीच तीच भाजी खाऊन कंटाळलात, ट्राय करा 'आलू कोफ्ता', रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

Kumbha Rashi: कुंभ राशीचा शनिवार कसा जाणार? दुपारनंतर मिळणार मोठा लाभ; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT