sambhaji bhide
sambhaji bhide  saam tv
मुंबई/पुणे

Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंना राज्य महिला आयोगाची पुन्हा नोटीस; उत्तर न दिल्यास...

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Sambhaji Bhide Todays News: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संभाजी भिडेंच्या (Sambhaji bhide) अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मग तुझाशी बोलतो’,असे म्हणत जाहीर अपमान केला होता. याबाबत भिडेंना ३ नोव्हेंबरला राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला भिडेंनी कोणतंही उत्तर दिलं नसल्याने त्यांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. (Sambhaji Bhide Notice News)

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

संभाजी भिडे हे बुधवारी (2 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना थांबवले. यावेळी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य करत काढता पाय घेतला.

'आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो', असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीका झाली. त्यातच आता त्यांना राज्य महिला आयोगाने सुद्धा नोटीस पाठवली होती. (Latest Marathi News)

महिला आयोगाची पहिली नोटीस

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी संभाजी भिडे यांना नोटीस धाडली होती. 'महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा', असं महिला आयोगानं म्हटलं होतं. 

नव्या नोटीसमध्ये महिला आयोगानं काय म्हटलंय?

महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा अशी नोटीस आयोगाकडून दि. ०२/११/२०२२ रोजी बजावण्यात आली होती. यावर अद्याप त्यांच्याकडून खुलासा न आल्याने त्यांना आज पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला विहित मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. असं या नव्या नोटसमध्ये इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे संभाजी भिडेंच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

Bhavesh Bhinde Arrest : दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला केली अटक, मुंबईत दाखल

Prajakta Mali: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

SCROLL FOR NEXT