Vaccination : कौतुकास्पद ! महाराष्ट्राने गाठला 10 कोटी लसीकरणाचा टप्पा (Video) SaamTV
मुंबई/पुणे

Vaccination : कौतुकास्पद ! महाराष्ट्राने गाठला 10 कोटी लसीकरणाचा टप्पा (Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या विक्रमी लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा मोठा होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशासह जगभर कोरोनाने थैमान घातले असताना कोरोनावरती प्रभावी उपाय म्हणून भारतासह जगभर कोरोना लसीकरण मोहीम (Corona vaccination campaign) सुरू केली. आणि त्यामुळेच जगाने कोरोनावरती काही प्रमाणात मात केली. आपल्या देशात देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त केलेले विक्रमी लसीकरण तसेच या लसीकरणा मध्ये असलेला महाराष्ट्र राज्याचा वाटा मोलाचा होता.

अशातच आज पुन्हा आपल्या राज्याने लसीकरणामध्ये आपल्या राज्यांने एक मैलाचा दगड गाठला . राज्यात आतापर्यंत लसीचे 10 कोटी डोस देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

टोपे म्हणाले 'महाराष्ट्राने आज 10 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले असल्याने त्या सर्वांचे अभिनंदन करतो असं ते ट्विटद्वारे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT