Maharashtra Weather Update: Heavy Rain And Yellow Alert In Pune, Nashik, Jalgaon AI Image
मुंबई/पुणे

Rain Alert : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain Update News : महाराष्ट्रात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. पुणे घाटमाथा, नाशिक आणि जळगावला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

  • नाशिक आणि जळगावमध्ये विजांसह पाऊस होण्याचा अंदाज

  • मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

  • वादळी वारे आणि विजांच्या शक्यतेमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMD च्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे घाटमाथ्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात अचानक पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिकच्या घाटमाथ्यासह जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.

जळगावमध्येही विजांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याने दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.मराठवाड्यातही पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरींचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT