MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT FOR KONKAN, GHAT REGIONS & VIDARBHA  Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुण्यासह ७ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : राज्यात आज बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात आज बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता

  • कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांसाठी IMD ने येलो अलर्ट जारी केला

  • अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये विजांसह पावसाचा इशारा

  • शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचे प्रशासनाने आवाहन

राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, काही निवडक भागांमध्ये मात्र जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर दिवसभरात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अल्पावधीत मुसळधार पाऊस होऊ शकतो.

दुसरीकडे विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात.

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करावीत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात पाणीसाठा वाढला

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये सध्या एकूण ९९.०९ टक्के पाणीसाठा झाला असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असला तरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. सध्या खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरणात ९२.८४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये ८७.९७ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशेज घाट मार्ग पुर्ण बंद; पर्यायी मार्गांवर रात्रभर वाहतूक कोंडी, पर्यटकांचे हाल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

तरुणांना दिशा दिली तर देश जगात पावरफुल बनेल; Gen-Z बाबत काय म्हणाले IAS तुकाराम मुंढे?

Health Care : हात थरथरण्याचा लिव्हरशी काय संबंध? तरुणांमध्ये दिसून न येणाऱ्या आजारामागचं सत्य जाणून घ्या

अवघ्या ५ मिनिटांत करा दुधी भोपळ्याचे मऊ आणि कुरकुरीत थालीपीठ

SCROLL FOR NEXT