MAHARASHTRA RAIN UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT IN VIDARBHA, MARATHWADA, KONKAN AND CENTRAL MAHARASHTRA Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update : २० जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट', पुढील ४ दिवस पावसाचा जोर वाढणार; वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Weather Update Today News : हवामान विभागाने राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पाऊस जोर धरणार

  • विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

  • कोकण आणि सह्याद्री घाटमाथा परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता

  • नागरिकांना उकाडा पासून मिळणार दिलासा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र दोन दिवसांपासून अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरींनी नागरिकांना दिलासा दिला आहे. काल मुंबईसह काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ४ ते ५ दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागले दर्शवला आहे.

आज कसा असेल पाऊस?

IMD ने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, या भागात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असून खरीप हंगामातील पिकांसाठी पुरेशा पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

पावसाचे प्रमाण वाढल्यास पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाट परिसरातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील ४ ते ५ दिवस कसं असेल हवामान?

हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील वातावरणात निर्माण झालेल्या अनुकूल स्थितीमुळे पावसाचा जोर वाढण्यास मदत होत आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT