Maharashtra Rain Alert: Orange Alert In Pune, Yellow Alert In Konkan Saam tv
मुंबई/पुणे

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Update Today : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोकणासह अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पावसाचा जोर वाढला

  • पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

  • कोकण, मुंबई, ठाणे, रायगड आणि इतर घाटमाथ्यांसाठी यलो अलर्ट

  • नागपूरमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा वाढला

Maharashtra Today Weather Update News राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने आज काही भागांसाठी सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणासह काही घाटमाथ्यांच्या भागात जोरदार सरींची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजचा पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे घाटमाथ्यासह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागांत काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात यंदा पाऊस असमान

दरम्यान, राज्यात यंदा पाऊस असमान राहिला आहे. ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत सरासरीच्या केवळ २५ ते ५० टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. यामध्ये नंदुरबारमधील चार, कोल्हापूरमधील दोन आणि अहिल्यानगरमधील एका तालुक्याचा समावेश आहे. तब्बल १९० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, ५४ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, १६५ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

नागपूरमध्ये उकाडा वाढला

नागपूरमध्येही गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलैच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढली असून उकाड्याचा त्रास जाणवत आहे. गेल्या २४ तासांत नागपूरचे तापमान ४.२ अंशांनी वाढून ३३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा २.९ अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ आणि १४ ऑगस्टला नागपुरात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT