Manasvi Choudhary
हिरव्या भाज्या आणि पालेभाज्या संतुलित आहारात अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. या भाज्यांमधून शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात.
अनेक लहानमुले हिरव्या पालेभाज्या खात नाहीत. मात्र मेथी, शेपू, मुळा, पालक यासांरख्या इतर पालेभाज्या खाणे देखील आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
शरीराला पोषण देणाऱ्या आणि दररोजच्या आहारात खाव्यात अश्या 7 भाज्या कोणत्या ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पालकमध्ये लोह , व्हिटॅमिन ए, सी आणि केअसते यामुळे ही भाजी नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते
मेथीची भाजी पचनासाठी अतिशय उत्तम मानली जाते. यामध्ये फायबर आणि अमिनो अॅसिड असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
चवळीच्या भाजीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी असते. ही भाजी हाडे बळकट करण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
शेपू पालेभाजीमध्ये कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हाडे बळकट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी शेपूची भाजी उत्तम मानली जाते.
मुळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. ही भाजी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, जे किडनी आणि लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
माठाची भाजी पचनासाठी अतिशय हलकी असते. यामध्ये प्रोटीन, फायबर आणि विविध खनिजे असतात, जे शरीराची ताकद वाढवतात.