Pune news Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

Pune News : हवामान खात्याने पुण्याला आज रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील चारही प्रमुख धरणे तब्बल ९४ टक्के भरली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात मुसळधार पावसामुळे हवामान विभागाचा रेड अलर्ट.

  • खडकवासला धरणातून मुठा नदीत ४३५६ क्युसेक्स विसर्ग.

  • चार प्रमुख धरणे ९४ टक्क्यांहून अधिक भरली, टेमघर ९७ टक्के भरले.

  • महापालिका व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला असून पुण्यातही मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला असून प्रशासनाने खबरदारीची सर्व तयारी केली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे पाणी साठा वाढत असल्याने धरणांतून विसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील खडकवासला धरणातून सकाळी नऊ वाजता मुठा नदीत तब्बल ४३५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या २१७८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही पाण्याचा साठा जलद गतीने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे आणि धरणाची पातळी वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुठा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अशी आहे पुणे महापालिकेची तयारी

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन विशेष पथके तैनात केली आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन आपत्कालीन पथके कार्यरत आहेत. मलनिःसारण विभागातील अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्यास जलसंपदा विभाग व पोलिस खात्याशी समन्वय साधून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

बाबा भिडे पूल परिस्थिती

दरम्यान, पुण्यातील बाबा भिडे पूल अद्याप पाण्याखाली गेलेला नसला तरी सतत वाढणारा विसर्ग लक्षात घेता पुढील काही तासांत परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुठा नदीतील पाणीपातळी वाढल्यास वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला

पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्व प्रमुख धरणे तब्बल ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास ही धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हा दिलासा आहे.

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने येत्या २४ तासांत पुण्यात व परिसरात मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, नदीकाठ व धरणांच्या परिसरात जाणे टाळावे, अशा सूचना पुणे महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत.

जाणून घ्या पुण्यातील धरणक्षेत्र किती टक्के भरली ?

टेमघर धरण : ९७ टक्के

खडकवासला: ६६.८६ टक्के

पानशेत: ९६.७६ टक्के

वरसगाव: ९५.७४ टक्के

टेमघर: ९७.७४ टक्के

एकूण पाणीसाठा: ९४.४१ टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण पाणीसाठा: ९७.२७ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावाला चकाकी! १० तोळं सोनं ४,३०० रूपयांनी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Rain Live News: वसई- विरारमध्ये पावसाचा कहर, रस्ते पाण्याखाली

Shreya Bugde: सुंदरता काय असते? श्रेयाकडे पाहून कळेल

The Bengal Files: 'द बंगाल फाइल्स' रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविरोधात एफआयआर दाखल

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

SCROLL FOR NEXT