Surabhi Jayashree Jagdish
आपण अनेकदा पाहिलं असेल की, रात्री काही प्राण्यांचे डोळे चमकतात. ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते.
चित्ता, सिंह, मांजर, कुत्रा आणि गाय यांसारख्या अनेक प्राण्यांच्या डोळ्यांत ही चमक स्पष्ट दिसते. विशेषतः रात्री किंवा कमी प्रकाशात हे जास्त जाणवतं. म्हणूनच त्यांच्या नजरेत वेगळेपणा दिसून येतो.
रात्री डोळे का चमकतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. हा केवळ योगायोग नसून निसर्गाची खास रचना आहे.
तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांच्या डोळ्यांत मणिभीय पदार्थाची एक हलका परावर्तित करणारा थऱ असतो. हा लेयर डोळ्यांच्या मागच्या बाजूला असतो. यामुळे त्यांच्या डोळ्यांची रचना माणसांपेक्षा वेगळी असते.
डोळ्यांवर प्रकाश पडताच हा थऱ तो प्रकाश परत परावर्तित करतो. म्हणूनच डोळे चमकत असल्यासारखे दिसतात. हेच त्यांच्या नजरेत तेज दिसण्यामागचं कारण आहे.
मांजराच्या डोळ्यांच्या मागे असलेल्या या थराला ‘ल्यूमिनियस टेपटम’ असं म्हणतात. हा थर अंधारातही प्रकाशाचा उपयोग करून घेतो. यामुळे मांजराला कमी प्रकाशातही स्पष्ट दिसू लागतं.
ज्या प्राण्यांच्या डोळ्यांत रक्तवाहिन्या जास्त असतात त्यांची नजर लालसर दिसू शकते. ही लालसर छटा प्रकाशामुळे अधिक ठळक होते.