Pune Dam Water Level: पुणेकरांना बाप्पा पावला! पाणीपुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली, वाचा आकडेवारी

Pune Rain And Dam Water Level: पुण्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले.
Pune Dam Water Level: पुणेकरांना बाप्पा पावला! पाणीपुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली, वाचा आकडेवारी
Pune Dam Water Level TodaySaam TV
Published On

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांना गणपती बाप्पा पावला. पुणेकरांचा वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. कारण पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या २ महिन्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चारही धरणं १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांना आनंद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी रात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. संपूर्ण विसर्ग हा आता बंद केला आहे. चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा असल्याने चार ही धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनाचे टेन्शन मिटलं आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत ही तीन धरणं १०० टक्के भरली आहेत. तर खडकवासला धरण ९९.१६ टक्के भरलले आहे. पुणे शहरानंतर आता जिल्ह्याला देखील पाणीपुरवठा करणारी धरणं चांगल्या क्षमेतेने भरली आहेत. नीरा खोऱ्यातील पवना धरण, कासारसाई धरण, कळमोडी धरण, चासकमान धरण, भामा आसखेड धरण, आंध्रा धरण, वडिवळे धरण, शेटफळ धरण, नाझरे धरण, गुंजवणी धरण, भाटघर धरण, नीरा देवघर धरण आणि वीर धरण या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहेत. या सर्व धरणांमध्ये १२५.६३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

Pune Dam Water Level: पुणेकरांना बाप्पा पावला! पाणीपुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली, वाचा आकडेवारी
Pune News : गर्भवती मुलीला रुग्णालयात नेलं, डॉक्टरांना शंका येताच आई-वडील गोत्यात; पुण्यात नेमकं काय घडलं?

तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे धरण, माणिकडोह धरण, येडगाव धरण, वडज धरण, डिंभे धरण, चिल्हेवाडी धरण आणि घोड धरण या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. आतापर्यंत या सर्व धरणात ६७.९३ टीएमसी पाणीसाठी जमा झाला आहे. तर उजनी धरणामध्ये १८४.८३ टीएमसी आणि मुळशी धरणामध्ये ३६.१७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. पण आता धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

Pune Dam Water Level: पुणेकरांना बाप्पा पावला! पाणीपुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली, वाचा आकडेवारी
Pune Traffic: गणेश विसर्जनादरम्यान पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, १७ रस्ते राहणार बंद; वाचा डिटेल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com