पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. ४ धरणांपैकी ३ धरणं १०० टक्के भरली तर एक धरणं ९९ टक्के भरले आहे. पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये एकूण मिळून ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला दररोज या धरणांमधून पाणीसाठा केला जातो.
खडकवासला: ९०.३९ टक्के
पानशेत: १०० टक्के
वरसगाव: १०० टक्के
टेमघर: १०० टक्के
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.