Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Stray Dogs : पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, दिसेल त्याचे तोडले लचके, चिमुरड्यासह १० जण जखमी

Pune News : पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची मालिका घडली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने दहा नागरिकांना चावा घेतला तर सात कुत्र्यांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला केला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनावर उपाययोजनांची मागणी होत आहे.

Alisha Khedekar

  • मांजरी खुर्द येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दहा नागरिकांना चावा घेतला.

  • चिखलीत सात कुत्र्यांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला, तो प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला.

  • जखमींवर ससून रुग्णालय व स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

  • नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील मांजरी खुर्द येथे भटक्या कुत्र्याने दहा पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतला. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांजरी खुर्द येथे गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावभर धुमाकूळ घालत दहा पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतला. या हल्ल्यात लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश होता. शुक्रवारी सकाळी नगरपालिकेचे कर्मचारी कुत्रा पकडण्यासाठी आल्यानंतर त्यांना तो नदीकिनारी मृतावस्थेत आढळून आला. मात्र, या कुत्र्याने किती जणांना चावा घेतला आणि त्याचा संसर्ग किती पसरला याची पडताळणी अजून सुरू आहे.

दुसरी घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखली मोरे वस्ती येथे घडली. पहाटे पाचच्या सुमारास कामावर जाणाऱ्या एका तरुणावर सात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तो तरुण गंभीर धोक्यात सापडला होता. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्याने जवळचा फ्लेक्स बोर्ड ओढून घेतला आणि त्याचा उपयोग ढाल म्हणून केला. इतकेच नाही तर त्याने आपल्या दुचाकीचा आधार घेत कुत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

काही वेळ त्याने दुचाकी कुत्र्यांच्या अंगावर ढकलून त्यांना परतवण्याचाही प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांचं टोळकं माघार घेण्यास तयार नव्हतं. अखेर काही मिनिटांच्या संघर्षानंतर परिसरातील काही नागरिक बाहेर आले आणि तेव्हा कुत्रे बाजूला झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मांजरी खुर्दसारख्या गावात सलग दहा जणांना चावा घेतल्याची घटना आणि चिखली येथे एकाच वेळी सात कुत्र्यांच्या टोळक्याने केलेला हल्ला हे प्रकार निश्चितच धोकादायक आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही समस्या जीवघेणी ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची, लसीकरण मोहिमा काटेकोरपणे राबवण्याची आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT