Amit Thackeray and Sada Sarvankar  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: माघारीसाठी दबाव आणि धमक्या, पण मी लढणारच; सदा सरवणकर निर्णयावर ठाम

Amit Thackeray Vs Sada Sarvankar: सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा यासाठी दबाव टाकला जात आहे. पण आपण उमेदवारी मागे घेणार नसल्याचे सदा सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Priya More

माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने महेश सावंत यांना तिकीट दिले आहे. पण सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा यासाठी दबाव टाकला जात आहे. पण आपण उमेदवारी मागे घेणार नसल्याचे सदा सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सदा सरवणकर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'माझ्यावर प्रचंड दबाव आहे. माझ्यावर दबाव टाकला जातोय आणि मला धमक्या देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. तरी देखील मी माझ्या मतावर ठाम आहे. मी एबी फॉर्म भरणार आहे. बिनशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात माझ्याशी कुठल्याही पद्धतीची चर्चा झाली नव्हती. महायुतीतील इतर नेत्याची भूमिका मांडली. त्यांची भूमिका असेल अजून प्रत्यक्षात तसं काही नाही.'

तसचं, 'ज्याअर्थी मला एबी फॉर्म देण्यात आला त्याअर्थी महायुतीचा माझ्या उमेदवारीसाठी पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. राज ठाकरे आणि माझ्यामध्ये कुठलाही पद्धतीचं बोलणं झालं नाही. १५ वर्षांत मी बरीच काम केली असल्यामुळे साडेतीन लाख मतदार हे मला निवडून देतील.', असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीतील शिदे गटाकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे लोकसभेला मनसेने पाठिंबा दिला तसंच आता देखील होईल आणि याचा सदा सरवणकर यांना फायदा होईल असे वाटत होते. पण मनसेने अमित ठाकरे यांना माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे मनसेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या मतदारसंघात मनसेने जोरदार प्रचार सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मिनी मंत्रालयाचा फैसला आज; १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार?

Accident : भंडारा खाऊन घरी निघाल्या, वाटेतच ८ जणींना कारने चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

Shocking News: कारमध्ये आढळले १ महिला अन् २ पुरूषांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? दिल्लीत खळबळ

Maharashtra Live News Update: उद्योग मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Paneer Ghotala Recipe : सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी बनवा पनीर घोटाळा, पोषण मिळेल अन् वेळही वाचेल

SCROLL FOR NEXT