Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरेसेनेच्या ६ बंडखोरांना व्हिप लागू होणार का? पक्षाने बोलावली तातडीची बैठक

Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी ४ वाजता शिवसेना ठाकरे गटाने महत्वाची बैठक बोलावली आहे. ठाकरेसेनेच्या ६ बंडखोरांना व्हिप लागू होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

शिवसेना ठाकरे गटाने ६ बंडखोर खासदारांना बजावलेला व्हिप कायदेशीरदृष्ट्या लागू होणार का? यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या संसदीय गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश अनिल देसाई यांनी दिले आहेत. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. चिप व्हिप अनिल देसाई यांनी व्हिप जारी केला. पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे. ठाकरे गटाची साथ सोडून गेलेल्या ६ खासदारांनाही व्हीप बजावण्यात आला आहे.

लोकसभा सचिवालयाने शिंदेसेनेत सामील झाल्याची मान्यता दिलेल्या ६ खासदारांना ठाकरेसेनेचा आजचा व्हिप लागू होणार का? याबाबत कायदेशीर पेच कायम आहे. सचिवालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसल्याने सध्या संसदीय नोंदींनुसार हे सहा खासदार शिंदेसेनेचे आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेच्या व्हिपचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई टिकेल का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

कायद्यानुसार नेमकी स्थिती -

संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील (Anti-Defection Law) परिच्छेद २(१)(ब) नुसार, पक्षाच्या अधिकृत निर्देशाविरोधात मतदान केल्यास किंवा मतदानापासून दूर राहिल्यास सदस्य अपात्रतेच्या कारवाईस पात्र ठरू शकतो. मात्र, येथे महत्त्वाचा मुद्दा असा की, १८ जुलै २०२६ रोजी लोकसभा सचिवालयाने सहा खासदारांना शिंदे सेनेत सामील झाल्याची मान्यता दिली आहे. त्या निर्णयाला अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही आणि अंतरिम स्थगितीही दिलेली नाही. मग ठाकरे सेनेचा व्हिप त्या सहा खासदारांना लागू होईल का? सध्याच्या प्रभावी संसदीय स्थितीनुसार, ठाकरे सेनेचा व्हिप या सहा खासदारांवर लागू होतो, असे ठामपणे म्हणता येणार नाही.

कारण काय?

लोकसभा सचिवालयाने त्यांची पक्षीय नोंद शिंदे सेनेकडे बदलली आहे. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे संसदीय नोंदींनुसार ते सध्या शिंदे सेनेचे खासदार म्हणून मान्य आहेत. ठाकरे सेनेचा व्हिप त्यांच्यावर लागू असल्याचा दावा करता येईल; पण त्याचे उल्लंघन झाल्यास अपात्रतेची कारवाई टिकेल का, याबाबत कायदेशीर वाद आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या Subhash Desai v. Principal Secretary, Governor of Maharashtra (११ मे २०२३) निकालानुसार, व्हिप हा मूळ राजकीय पक्षाने किंवा पक्षाने अधिकृत केलेल्या व्यक्तीने नियुक्त केलेला असणे आवश्यक आहे. विधिमंडळ पक्षातील बहुमताला स्वतःहून व्हिप बदलण्याचा अधिकार नाही.

लोकसभा सचिवालयाने शिंदे सेनेत सामील झाल्याची मान्यता दिलेल्या सहा खासदारांना ठाकरे सेनेचा आजचा व्हिप लागू होणार का, याबाबत कायदेशीर पेच कायम. सचिवालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसल्याने सध्या संसदीय नोंदींनुसार हे सहा खासदार शिंदेसेनेचे आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेच्या व्हिपचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई टिकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कोणाच्या मेहनतीला मिळणार दाद, तर कुोणाच्या मनातील इच्छा होणार पूर्ण? आजचे राशिभविष्य वाचा

Maharashtra News Live Update: नागपुरात एमडी ड्रग्स तस्करी करणाऱ्या आरोपीवर नंदनवन पोलिसाची कारवाई

महामार्गावर भीषण अपघात! काँग्रेस नेता अन् बजरंग दलाच्या अध्यक्षाचा जागीच मृत्यू

Queen Necklace : समुद्रकिनाऱ्यावरील दिव्यांची जादू! 'क्वीन नेकलेस' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' सुंदर ठिकाण

Breaking News : उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली; चेन्नई दौरा रद्द

SCROLL FOR NEXT