Queen Necklace : समुद्रकिनाऱ्यावरील दिव्यांची जादू! 'क्वीन नेकलेस' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' सुंदर ठिकाण

Shreya Maskar

हारासारखा दिसणारा रस्ता

मुंबईतील मरीन ड्राइव्हचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगत अर्धवर्तुळाकार वळण घेतो. रात्री हा परिसर हारासारखा सुंदर दिसतो.

Marine Drive | pinterest

रात्रीच्या दिव्यांची रोषणाई

मरीन ड्राइव्हवरील रस्त्याच्या कडेला असलेले दिवे रात्री उजळतात. हे दिवे समुद्रकिनाऱ्यावर मोत्यांच्या माळेसारखे चमकताना दिसतात.

Marine Drive | pinterest

'क्वीन नेकलेस' नावामागचे कारण

रात्री उंच इमारती किंवा टेकडीवरून मरीन ड्राइव्हकडे पाहिल्यास दिव्यांची रांग एखाद्या राणीच्या गळ्यातील हारासारखी भासते. त्यामुळे त्याला 'क्वीन नेकलेस' म्हटले जाते.

Marine Drive | pinterest

अरबी समुद्राचा सुंदर नजारा

एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शहराची रोषणाई यामुळे मरीन ड्राइव्हचे सौंदर्य अधिक खुलते. सूर्यास्त पाहण्यासाठीही हे लोकप्रिय ठिकाण आहे.

Marine Drive | pinterest

मुंबईची खास ओळख

मरीन ड्राइव्ह हा मुंबईच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथील समुद्रकिनारा, पदपथ आणि रात्रीची रोषणाई पर्यटकांना आकर्षित करते.

Marine Drive | pinterest

रात्रीच्या वेळी खास आकर्षण

संध्याकाळनंतर मरीन ड्राइव्हवरील दिवे उजळल्यावर 'क्वीन नेकलेस'चे सौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे हे ठिकाण मुंबईच्या आकर्षक ओळखीचा भाग बनले आहे.

Marine Drive | pinterest

कसं पोहचाल?

मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राइव्हला लोकल ट्रेन, मेट्रो, बेस्ट बस किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते. पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाइन्स, चर्चगेट किंवा चर्नी रोड स्थानकावर उतरून मरीन ड्राइव्हला जाता येते.

Marine Drive | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Marine Drive | pinterest

NEXT : गुलाबी थंडीत करा विदर्भाची सफर, 'ही' ७ सुंदर ठिकाणे पाहून पुन्हा पुन्हा येथेच ट्रिप प्लान कराल

Vidarbha Travel | AI PHOTO
येथे क्लिक करा...