Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभेत भाजप तब्बल १७० जागा लढवणार? शिंदे-पवार गटाची धाकधूक वाढली, पाहा VIDEO

Satish Daud

लोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. अशातच शनिवारी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप १७० ते १८० जागा लढवाव्यात, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

याआधीच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विधानसभेच्या १६४ जागा लढविल्या होत्या. यातील १०५ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, तरीही भाजपला मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळावं अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे.

त्यामुळे आपण १७० ते १८० जागांवर उमेदवार उभे करायला हवे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपासून रडखडला आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी आमदारांची आहे. त्यामुळे याबाबतही तातडीने पावले उचलावीत असे मत बैठकीत मांडण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊनच विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे असेल, तर या गटातील काही आमदार परत तर जाणार नाहीत ना? याकडेही लक्ष दिले जात आहे. जे आमदार परतण्याच्या मनःस्थितीत आहेत त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येऊ नये. अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

शिंदे-पवार गटाची धाकधूक वाढली

विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल १७० जागा लढवण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र, अद्याप यावर कोणत्याही नेत्यांनी उघडपणे भाष्य केलेलं नाही. जर असे झाल्यास शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला नेमक्या किती जागा मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत १५ पैकी ७ जागा जिंकणाऱ्या शिंदे सेनेने आपणच महायुतीत मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील विधानसभा निवडणुकीत ९५ ते १०० जागांवर उमेदवार देण्यास आग्रही आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी तशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे. अशातच भाजपने १७० जागा लढवण्याची भूमिका घेतल्यास शिंदे-पवार गट नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांमध्ये जागावाटपाबाबत काही दिवसांतच बैठक होणार असल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT