Bharat Gogawale Perform Aghori Ritual Saam
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भरत गोगावलेंनी घरी अघोरी पूजा का केली? ठाकरे गटाच्या खासदाराने सांगितलं धक्कादायक कारण

Bharat Gogawale Perform Aghori Ritual: शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा केली होती. यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत. ठाकरे गटाच्या खासदाराने यावरून टीका करत या अघोरी पूजेचं धक्कदायक कारण सांगितलं.

Priya More

शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घरामध्ये अघोरी पूजा केली होती. याचा व्हिडीओ समोर आला होता. यावरून भरत गोगावले यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भरत गोगावले यांनी घरी केलेल्या अघोरी पूजेवर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्राला काळीम फासणारी ही कृती असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

भरत गोगावले यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'महाराष्ट्राला काळीम फासणारी ही कृती आहे. अंधश्रद्धेविरुद्ध महाराष्ट्राने कायम लढा दिला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत मंत्र्यांचे पीए जसे ते तपासून घेतात तसे त्यांनी मंत्री देखील तपासून घेतले पाहिजेत. आघोरी नेते असलेले मंत्री महाराष्ट्राचा काय भलं करणार. याबद्दल जास्त माहिती द्यायची तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार शिदे गटाची लोक करतायेत.'

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'माझा विश्वास नाही तरी हे समोर येतंय. जनतेच्या कल्याणाचे यांना काही पडलेलं नाही. लोकशाहीशी यांना काही पडलेलं नाही. मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणे तसा शिंदे गटाच्या मंत्र्यांना या आघाडी उपक्रमाद्वारे भाजपाच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट करायचं आहे. व्हिडिओ समोर आले आहेत. ते त्यासाठीच सुरू आहेत हे वेगवेगळ्या भागात सुरू आहे. साताऱ्यापासून महाडपर्यंत महाडपासून सावंतवाडी बेळगावपर्यंत प्रत्येक ठिकाणी हेच सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rules: कामाची बातमी! बँक, पेन्शन अन् आधारच्या नियमात बदल; तुम्हाला माहितच असायला हवे

Mumbai Kabutarkhana : मुंबईत 4 ठिकाणी कबुतरखान्यांना परवानगी, सकाळी 7 ते 9 या कालावधीतच दाणे टाकण्यास अनुमती | VIDEO

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...

Local Body Election : निवडणुकीआधी शरद पवारांना जोरदार धक्का, २ विश्वासू शिलेदारांचा राष्ट्रवादीला रामराम

SCROLL FOR NEXT