Vijay Wadettiwar|Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Vijay Wadettiwar: 'भ्रष्टाचारी सरकार, मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला', डॉ. भगवान पवार यांच्या पत्रानंतर विजय वडेट्टीवारांचा घणाघात!

Maharashtra Politics News: "महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Gangappa Pujari

पुणे, ता. २६ मे २०२४

पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी नियमबाह्य काम करण्याचा दबाव आणला गेला, याच कारणामुळे निलंबन करण्यात आले, असे गंभीर आरोप या पत्रामध्ये करण्यात आले आहेत. या लेटर बाँम्बनंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत विजय वडेट्टीवार?

"महायुती सरकार मध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

तसेच "पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली याबाबत अनेक खुलासे करून मंत्र्यावर गंभीर आरोप केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

" आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळा पासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जाणते समोर आणत आहेत,"

"या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडर साठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये. तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे," अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

आंबट-गोड चिंच खाल्ल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे परिणाम

Accident News : मध्यरात्री टँकरची ऑटोला धडक, भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू, ७ जणांची प्रकृती गंभीर

राज ठाकरे भल्या सकाळी थेट 'वर्षा' बंगल्यावर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT