Vidhan Sabha Election MVA saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : तारीख ठरली! महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा 'या' दिवशी होण्याची शक्यता

Mahavikas Aghadi seat sharing meeting tomorrow : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची उद्या महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. तिन्ही घटक पक्षातील प्रमुख या बैठकीला हजेरी लावतील, असा अंदाज आहे.

Rohini Gudaghe

सुनील काळे, साम टीव्ही मुंबई

राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला उद्यापासून (२१ ऑगस्ट ) सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची उद्या पहिली बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल लीलामध्ये उद्या सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.

महाविकास आघाडीची उद्या महत्वाची बैठक

या बैठकीमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवारांकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल परब यांचा समावेश (Maharashtra Politics) आहे. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरेही पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हा आकडा होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये कॉंग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या (Vidhan Sabha Election) होत्या. त्यावेळी देखील जागावाटपासंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली होती. परंतु महाविकास आघाडीने कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा, हे अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून देखील मविआमध्ये चांगलीच जुंपली होती, परंतु आता उद्या होणार बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या बैठकीमधून विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा मुद्दा चर्चेत (Mahavikas Aghadi seat sharing) आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत उद्या महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं, तर महायुतीला अपेक्षित यश मिळालं (MVA Meeting) नव्हतं. महायुतीने जागावाटपाला उशीर झाल्यामुळे मतांचा फटका बसल्याचं सांगितलं होतं. त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT