Pune Political News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुण्यात अजित पवारांची वाट खडतर? चेतन तुपे आणि सुनील टिंगरेंनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याला मारली दांडी

Priya More

सचिन जाधव, पुणे

Maharashtra Political Upadtes in Marathi: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. नेते मंडळींकडून बैठका, मेळावे त्याचसोबत नागरिकांसोबतच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. पुण्यामध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे दोन्ही आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. आमदार चेतन तुपे आणि आमदार सुनील टिंगरे यांनी या मेळाव्याला दांडी मारली. या मेळाव्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी अपेक्षा व्यक्त करण्यात आले असतानाच अजित पवार गटाच्या शहरातील दोन्ही आमदारांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चांगली चर्चा रंगली. हे दोघेही मेळाव्यामध्ये न दिसल्यामुळे पुण्यात आता जोरदार चर्चा सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सेंट्रल पार्क येथे मेळावा झाला. या मेळाव्यास राष्ट्रवादी व्यापार या सेलचे प्रदेशाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष, माजी महापौर, माजी नगरसेवक उपस्थित होते. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे. तसेच राज्यपालनीत सदस्य आणि दीपक मानकर यांना विधान परिषदे पाठवावे असे दोन ठराव मंजूर करण्यात आले. दोघेही आमदार मेळाव्याला उपस्थितीत नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्याला उपस्थित न राहिल्याबद्दल सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझी तब्येत ठीक नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही. काळजी करू नका मी अजितदादांसोबत आहे आणि अजितदादांसोबतच राहणार आहे.', असे स्पष्टीकरण वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News: 'रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असं काम', भाजप नेत्याची खासदार विशाल पाटलांवर जहरी टीका

Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वे; नाशिकमध्ये गुप्त मतदान, पडद्यामागे काय घडतयं?

Pune Daund CCTV Accident : दोन ट्रकमध्ये अडकला; चालता बोलता कामगार जिवानिशी गेला, अपघाताचा थरार CCTVत कैद

Maharashtra News Live Updates: भाईंदरमध्ये मुलीचा व्हिडिओ काढणाऱ्याला मनसेने दिला चोप

Water Bottle Blue Cap: पाण्याच्या बाटलीचे झाकण निळ्या रंगाचंच का असतं? जाणून घ्या खरं कारण...

SCROLL FOR NEXT